उदंड झाले खड्डे

आधुनिक तंत्रज्ञानानंतरही खड्ड्यांची संख्या ७९३ वरून ९६५ वर

ठाणे : शहरातील खड्डे बुजवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मात्रा लागू पडली नसून उलट आधीच्या खड्ड्यात आणखी १७२ खड्ड्यांची भर पडली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून खड्डे बुजाव मोहीम सुरु असली तरी सिमेंट कॉंक्रीटने बुजवलेल्या खड्ड्यांवरची खडी पुन्हा बाहेर आली आहे. त्यामुळे दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. महापालिका हद्दीत असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या आता ९६५ झाली आहे. त्यातील ८४८ खड्डे भरल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर ११७ खड्डे भरण्याचे शिल्लक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेने शहराच्या विविध भागात पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाने बुजविले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ४.२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार डब्ल्युबीएम, कोल्ड मिक्स, पेवर ब्लॉक, कॉंक्रीटीकरण, डांबरीकरण आदी पध्दतीने हे खड्डे बुजविण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

प्रभाग समिती – खड्डे – बुजविण्यात आलेले खड्डे – शिल्लक खड्डे
नौपाडा कोपरी – ८४ – ७० – १४
उथळसर – ९१ – ८६ – ०५
कळवा – ६४ – ५३ – ११
मुंब्रा – ३४ – २० – १४
वागळे – ८२ – ७२ – १०
वर्तकनगर – १३२ – १२५ – ०७
दिवा – ३४० – ३२० – २०
लोकमान्य सावरकर- ६३ – ४७ – १६
—————————————————————–
एकूण – ९६५ – ८४८ – ११७