दिव्यालाही मिळणार साडेसहा एमएलडी पाणी

खासदार श्रीकांत शिंदे यांचा दावा

ठाणे : दिवेकरांना साडे सहा दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी देण्यात आले आहे. यामुळे दिव्यातील पाणी टंचाईची समस्या सुटेल, असा दावा पालिका खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या जलवाहीनीवरून नवीन जोडणी घेत कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना वाढीव २० दशलक्षलीटर पाणी पुरवठा सुरु केला आहे. एमआयडीसीने दिवा भागात साडे सहा दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध करून दिले असून त्याचा शुभारंभ मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते.

ठाणे महापालिका हद्दीत रोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. लोकसंख्येच्या मानाने तो अपुरा पडू लागला आहे. ठाणे शहर, कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. पाणी टंचाईच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असतानाच, मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्षलीटर तसेच मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्षलीटर पाणी देण्याचे आदेश दिले. यामुळे ठाणे शहराला एकूण १२० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी मिळणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या जलवाहीनीवरून नवीन जोडणी घेत कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना वाढीव २० दशलक्षलीटर पाणी पुरवठा सुरु केला आहे. त्यात किसननगर, भटवाडी भागाला चार दशलक्षलीटर, वागळे इस्टेट येथीस इंदिरानगर संप हाऊसवरून पाणी पुरवठा होणार्या भागांना १० दशलक्षलीटर आणि कोपरी, आनंदनगर भागाला सहा दशलक्षलीटर असे वाढीव पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ एमआयडीसीने दिवा भागात साडे सहा दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध करून दिले असून त्याचा शुभारंभ मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दिवा भागातील नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त होते. ही समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण शहराला १२० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी दिले असून त्यातील साडे सहा दशलक्षलीटर इतके पाणी दिव्याला उपलब्ध करु न देण्यात आले आहे. त्यामुळे येथील पाणी टंचाईची समस्या आता सुटेल, असा दावा खासदार शिंदे यांनी केला.