सांस्कृतिक उंचीही वाढावी

गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम या सणांवरील निर्बंध दर करण् ू याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची मने जिंकण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. मागील दोन वर्षांपासून या सर्व सणांवर कोरोनाचे सावट असल्यामुळे सरकारने सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रतिबंध घालणे अनिवार्य ठरले होते. महासाथ अद्याप पूर्णपणे संपुष्टात आली नसली तरी तिचे रुप अक्राळविक्राळ राहिलेले नाही. औषधोपचाराची नेमकी पद्धत आणि त्याचे परिणाम यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 98 टक्क्यांवर गेले आहे. मृत्यूच्या प्रमाणातही लक्षणीय घट झाली असून भीतीचे ढग दर झाले आहेत. ू साहजिकच मुख्यमंत्र्यांना निर्बंध दर करण् ू याची संधी मिळाली आहे आणि त्यामुळे जनतेमध्ये उत्साह संचारला तर आश्चर्य वाटूनये. गणेशमूर्तींच्या उंचीबद्दलची अट काढून टाकण्यात आली आहे. बाप्पाच्या मूर्तीचा थेट संबंध भाविकांच्या
उत्साहाशी होता. साहजिकच उत्साहाची उंची वाढणार आहे. उंच मूर्तींचे आकर्षण भक्तांना कायमच वाटत आले आहे. खास करुन मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळांना. तो भक्तीपेक्षा स्पर्धेचा भाग झाला होता, हे मात्र वाईट. उत्सवांवर होणारा खर्च हा कोणत्या नेत्याचा आशीर्वाद मिळतो यावर अवलंबून असतो. यंदा या आघाडीवर प्रचंड अनिश्चितता आहे. राजकीय उलथापालथांमुळे नेतेच संभ्रमात आहेत. अनिश्चिततेने त्यांना ग्रासले आहे. काही नेते हात सैल सोडून लोकप्रिय शाबूत ठेवतील. परंतु काही मंडळे पैशांनी विकले जाणार नाही असा स्वाभिमानी बाणाही स्वीकारतील. मूर्तींची उंची त्यामुळे अडेल असे नाही. परंतु उंच मूर्तींमुळे निर्माण होणारे प्रश्न कायमच रहातील. त्यावर तोडगा शोधणे हे सरकारपेक्षा त्या-त्या मंडळांचे कर्तव्य ठरते. जितकी मूर्ती उंच तितकी तिची काळजी अधिक. म्हणजे मूर्तीचे आगमन, पुढे विसर्जन, मंडळातील सुरक्षा व्यवस्था, पर्यावरणाचा मुद्दा, गर्दीचे नियोजन, स्वयंसेवकांचा सहभाग, सजावटीवर होणारा खर्च, त्यामागचे अर्थकारण आणि एकूण आर्थिक शिस्त असे विविध आयाम मोठ्या मूर्तीमुळे गंभीर होत जातात. दोन वर्षांच्या खंडानंतर सार्वजनिक उत्सव मंडळांना भले ही सर्व आव्हाने सवयीची असली तरी सरावाभावी विशेष मेहनत करावी लागणार. सार्वजनिक गणेशोत्सवाचे आणि महाराष्ट्राचे एक अलौकिक असे नाते आहे. गणेशोत्सवाकडे पर्यटनासाठी संधी म्हणून पाहिले जायला हवे. या काळात देशविदेशातून येणाऱ्या भाविकांची उत्तम सोय के ली तर अर्थकारणाला हातभार लागू शके ल. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर लाडक्या देवाचे स्वागत करण्यासाठी भक्त आतुर आहेत. दोन वर्षांचा उत्साहाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी महागाई, मंदी आदी नित्याच्या कटकटी बाजूला सारल्या जातील. अशा वेळी भक्तांनी कोरोनाने शिकवलेले कठोर धडे लक्षात ठेऊन उत्सव साजरा करावा. सरकारने निर्बंध काढून भक्तांवर भरवसा ठेवला आहे. त्या भरवशाची उंची वाढवावी. तसेच मूर्तीला साजेसे कार्यक्रम सादर करुन महाराष्ट्राची सांस्कृतिक उंचीही वाढवावी.