बाप्पा ‘त्यांना’ बुध्दी दे !

गणेशोत्सव-नवरात्रौत्सव असो की दहीहंडी या मराठमोळ्या सणांशी शिवसेनेचा घनिष्ठ संबंध असतो. त्यांच्या भव्य नियोजनाला राजकीय पक्षांचा हातभार लागत असतो. वरकरणी धर्मनिरपेक्ष म्हणवणारे पक्षही महाराष्ट्राची ओळख ठरलेल्या आणि भाविकांशी नाते जुळण्याची संधी देणाऱ्या उत्सवांपासून अलिप्त राहू शकलेले नाही. सण-उत्सवांचे राजकीयीकरण स्वीकारले गेले असताना या खेपेस मात्र मंडळांच्या अपरिहार्यतेस राज्यातील राजकीय उलथापालथीच्या परिणामांवर सामोरे जावे लागणार
आहे. शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या मंडळांवर मोठा बाका प्रसंग आला आहे. वर्षानुवर्षे ज्या पक्षाने रसद पुरवली त्यांना अवहेरुन शिंदे-गटाशी त्यांना जमवून घ्यावे लागणार आहे. काही मंडळांत हा वादाचा मुद्दा ठरु शकतो. कै . बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे सैनिक दोन्ही गटांत आहेत. परंतु एकाला एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य आहे तर दसऱ्ु याची ठाकरे परिवाराशी एकनिष्ठा आहे. त्यामुळे मंडळांत फू ट पडली तर आश्चर्य वाटू नये. मंडळाचे काम करताना राजकारणाचे जोडे बाहेर काढले जावेत ही भूमिका या मंडळांना राजकीय वादांपासून दर ठेऊ शकते. ू राजकारणाचे समाजकारणावर कसे परिणाम होऊ शकतात याचे गणेशोत्सव हे उदाहरण आहे. एकदिलाने आणि बाप्पाबद्दल निस्सीम श्रध्दा असणाऱ्या हजारो उत्सव-कार्यकर्त्यांच्या मनात मतभेदाचे विष कालवले जात आहे. या मंडळांना सहकार्य करणारे एके काळी कार्यकर्ते बनून सार्वजनिक जीवनात प्रवेश करते झाले. कोणी नगरसेवक झाला तर कोणी मंत्री. उत्सवांचे व्यासपीठ आपली मतदार संघात पकड घट्ट करण्यासाठी उपयोगी पडते. हेच कार्यकर्ते निवडणुकीत पक्षाचे बिल्ले लावून काम करण्यासाठी उपलब्ध होतात. ही उत्सव मंडळे भावी नेत्यांची कार्यशाळा असते, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरु नये. उत्सवातील मांगल्य आणि पावित्र्य जपताना भले राजकीय हेवेदावे असले तरी ते बाजूला ठेवले जात असे. आता मात्र ते चव्हाट्यावर येतील आणि उत्सवांमधील उत्साह, पावित्र्य आणि सांघिक भावना यांना तिलांजली मिळेल. अनेक नेते, यथावकाश अशा उत्सवांमध्ये गुंतवणूक करु लागले. धर्मप्रसारण
हा मूळ हेतू बाजूला सरला. उत्सव नेत्यांची गरज बनली. त्यांच्यासाठी ते जिव्हाळ्याचे आणि प्रतिष्ठेचे बनले. ही उत्सव मंडळे राजकारण्यांसाठी ऊर्जा-केंद्रे बनली आहेत. सळसळत्या उत्साहाचे कार्यकर्ते आता मात्र राजकीय मतभेदांमुळे नामोहरम होणार आहेत. अशा वेळी बाप्पानेच सर्व संबंधितांना बुध्दी देऊन महाराष्ट्रावर आलेले विघ्न दर करा ू वे, अशी प्रार्थना शेकडो कार्यकर्ते करीत असणार. राजकारणाचे दही, हंडीत आले आणि तिथेच सारी गडबड झाली. निर्मळ मनाचे गोविंदांचे मनोरे आता कसे उभे रहाणार, हीच अवघ्या महाराष्ट्रासमोरची चिंता आहे. बाप्पा संबंधितांना वेळीच बुध्दी देईल ही आशा.