ठाणे : शहरातील नवीन रूग्ण किंचित कमी झाले आहे आज ५१ रुग्णांची भर पडली आहे तर एक रूग्ण दगावला आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ४७जण रोगमुक्त झाले आहेत आत्तापर्यंत एक लाख ९०,१९६जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर ३७४जणांवर घरी आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत २,१४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ८८७ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ५१जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख ८२,५९० ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९२,७१२जण बाधित मिळाले आहेत.