अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली घटनेने दिलेल्या अधिकाराचा गैरउपयोग तर होत नाही ना याची खबरदारी जबाबदार असे बिरुद लावणाऱ्या नागरिकांनी घ्यायला हवी. अधिकाराच्या नाण्याची दसरी ब ु ाजू कर्तव्य असते याचे भान राखले गेले तरच लोकशाहीची विटंबना होणार नाही. हे सर्वविस्तृतपणे मांडण्याची वेळ आली आहे कारण समाजमाध्यमांवरून आक्षेपार्ह प्रतिक्रियांचे प्रमाण वाढू लागले आहे आणि आगामी काळात ते रोखले गेले नाही तर पोलिसांना क्षणभराचीही उसंत मिळणे अवघड
होऊन बसेल. राज्याच्या सायबर सेल विभागाने प्रसिद्ध के लेल्या आकडेवारीनुसार मार्च २०२२ ते जून २०२२ या काळात समाजमाध्यमे, त्यात ट्विटर, इन्स्टाग्राम, फे सबुक
आणि यु-ट्यूब यांचा समावेश होतो. समाजात तेढ वाढवणारी, कटुता पसरवणारी आणि एकु णातच सामाजिक शांततेस बाधा पोहोचेल असा मजकू र प्रस्तु करीत आहे. कोरोनाचे आगमन झाल्यापासून समाज के वळ शारीरिक व्याधींच्या फे ऱ्यात अडकला नाही तर अनेकांना नैराश्यातून असेल किं वा फावला वेळ मिळाला असेल म्हणून मानसिक असमतोलाने ग्रासले. काही प्रकरणात त्याचा थर विकृतीपर्यंतही गेला. अशा वेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. एकू ण ४०३ प्रकरणांत त्यांनी समाजमाध्यमे चालवणाऱ्या वरील संस्थांना आक्षेपार्ह मजकू र काढण्याच्या सूचना के ल्या. परंतु दोनशेहून अधिक प्रकरणांची या संस्थांनी दखल घेतली नाही. त्यामागे त्यांनी कायदेशीर कारणे सांगितली. इथेच खरे तर या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती संवेदनशील आहे हे कळते. तेच खरे आव्हानही आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करावा असा मजकू र टाकणाऱ्यांनाही त्यांच्या मताचा काय परिणाम होऊ शकतो हे माहित असणार. आपल्या समाजाची मानसिकता, त्याचे जडणघडण, शिक्षणाची पातळी, शिक्षणामुळे आणि परंपरागत सामाजिक मूल्यांमुळे येणारी परिपक्वता या सर्व बाबी सापेक्ष असतात. त्यामुळे फे सबुक असो वा इन्स्टाग्राम हे ज्या कायद्याची
ढाल पुढे करून आपल्या पोलिसांशी वाद घालत आहेत त्यांनी स्थानिक समाज-माध्यमवीरांची वैचारिक बैठकही तपासायला हवी. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. सहसा कोणत्याही सरकारला टीका आवडत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असा प्रक्षोभही नको असतो. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने ते गळचेपी करतात की काय अशी शंका इन्स्टाग्राम व अन्य लोकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. उभयपक्षी विचार के ला तर समाजमाध्यमांवर
व्यक्त होताना काही पथ्ये पाळणे हे निश्चितच जबाबदारपणाचे ठरेल.