ठाण्यात कोरोनाचे नवीन ४१ रुग्ण

ठाणे : शहरातील कोरोना रूग्ण वाढीचा आकडा कमी झाला आहे. आज ४१ नवीन रुग्णांची भर पडली असून एक रूग्ण दगावला आहे.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ५१जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९०,१५०रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ३७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रूग्ण दगावला असून आत्तापर्यंत २,१४१जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ८५४ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ४१जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख ८१,७०३ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९२,६६१जण बाधित मिळाले आहेत.