समाजातील शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या उपेक्षित-वंचित व्यक्तीस सत्तेत सहभागी करून घेण्याचा विचार केव्हाही स्वागतार्ह असतो. परंतु प्रत्यक्षात तो अं मलात येत नाही. हेवास्तव आहे. राजकारणातील हा दांभिकपणा जनतेने पूर्वीच स्वीकारला आहे आणि त्यामुळे खरोखरीच एखाद्या उपेक्षित वर्गाला प्रतिनिधीत्व दिले जाते तेव्हा त्याकडे संशयानेही पाहिले जाते. दांभिकपणा इतका चिकटल्यामुळे असेल परंतु राजकारणातील स्वागतार्ह आणि आदर्शवत विचारांकडेही संशयाच्या चष्म्यातून पाहिले जात असते. राष्ट्रपतीपदासाठी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यामागेत्यांचे आदिवासी असणे किं वा सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असणे या दोन निकषांचा विचार फार विचारपूर्वक झाला आहे असे म्हणावे लागेल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार श्रीमंताचेच आहे अशी प्रतिमा विरोधी पक्ष करीत असताना मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु प्रत्यक्षात विपक्षांतर्फेयशवंत सिन्हा यांना उमेदवारी देऊन त्यांनीच आपली भूमिका संदिग्ध केली. श्री. सिन्हा मुरब्बी राजकारणी आहेत. अनुभवी, अभ्यासू आणि उच्चशिक्षित आहेत. या तीन गुणांचा विचार केला तर त्यांच्यात उणीव काही नाही. केवळ ते उपेक्षित नाहीत म्हणून त्यांचा विचार होऊ शकला नसेल तर भारतीय लोकशाही परिपक्व नाही असेही म्हणता येऊ शकेल. त्यामुळे मुळात उपेक्षित, वंचित वगैरेअसण्यापेक्षा त्या पदास ती व्यक्ती न्याय देईल काय हे पाहणे अगत्याचे ठरावे. श्रीमती मुर्मू पदाला न्याय देतील हे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच देशातील समस्त वंचित समाजाला त्यांच्या रूपाने प्रतिनिधीत्व मिळाले हे महत्वाचे ठरते. या वर्गाला खुश करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत मतांची बेगमी करण्याचा सत्तारूढ पक्षाचा डाव असेल तर तो निकोप लोकशाहीला धरून होणार नाही. राष्ट्रपतीपदाच्या
निवडणुकीतही ‘इलेक्टीव्ह-मेरिट’ च्या राजकारणावर डोळा ठेवणे हेत्या पदाची गरिमा कमी करण्यासारखे ठरते. श्रीमती मुर्मू या सक्षम आहेत आणि प्रतिकू ल परिस्थितीतही एखादी महिला कशी कर्तृत्व सिद्ध करू शकते या गुणांचा विचार सत्तारूढ पक्षाने करायला हवा होता. त्यात या पदाची प्रतिष्ठा वृद्धिंगतच झाली असती. निवडून आल्यावर तरी सत्तारूढ पक्षाने नवीन राष्ट्रपतींच्या प्रतिमेस सवंगपणाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. श्रीमती मुर्मू राष्ट्रपती होतील तेत्यांच्या कर्तृत्व आणि केवळ उपेक्षितवंचित असण्यामुळे नाही. अन्यथा राज्यपाल असताना भाजपाच्या सरकारलाच आव्हान देण्याची हिंमत त्या दाखवू शकल्या नसत्या. त्या गुणांची कदर करायला हवी. राष्ट्रपती म्हणून त्या तसाच ठसा उमटवत राहतील अशी आशा आहे.