ठाणे : शहरातील कोरोना रूग्णवाढ रोडावली असून आज ४४ नवीन रुग्णांची भर पडली तर ७७जण कोरोनामुक्त झाले आहेत.
विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ७७जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८९,९३९जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात आणि घरी ४५३जणांवर उपचार सुरू आहेत. एकही जण दगावला नाही आत्तापर्यंत २,१४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ९८६ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ४४जण बाधित मिळाले. आत्तापर्यंत २४ लाख ७९,५४५ ठाणेकरांनी चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९२,५३२जण बाधित सापडले आहेत.