मुरबाड : तालुक्यातील काही शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले असले तरी मी तालुका प्रमुख या नात्याने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी चर्चा करूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुरबाड तालुका शिवसेना प्रमुख कांतीलाल कंठे यांनी दिली.
मुरबाड नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांनी शनिवार 16 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील नंदनवन या निवासस्थानी भेट घेत पाठिंबा दिला असल्याची माहिती नगरसेवक नितीन तेलवणे यांनी दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना या संदर्भात माहिती घेण्यासाठी फोन केला असता त्यांनी फोन न उचलल्याने माहिती मिळू शकली नाही.
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक आहोत. मुरबाड तालुक्यातील काही शिवसैनिक शिंदे गटात सामिल झाले असले तरी आम्ही अजूनही कोणत्या गटात सामिल व्हायचे आहे हे दोन दिवसानंतर शिवसैनिकांशी चर्चा करून ठरवणार आहोत, असे कांतीलाल कंठे यांनी सांगितले.