ठाणे : कोरोनाचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर पडणार नसल्याची खात्री झाल्यामुळे गणपती उत्सवासाठी जाणा-या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान मध्य रेल्वे अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार आहे.
म. रेल्वेने यापूर्वीच १९८ गणपती विशेष चालवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे यावर्षी एकूण गाड्यांची संख्या २०६ होणार आहे. 01165 विशेष लो. टिळक टर्मिनसहून येत्या १६ आॅगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत ४ सेवा दर मंगळवारी मध्यरात्रीनंतर १२.४५ वाजता सुटेल. मंगळुरु जंक्शन येथे त्याच दिवशी सायंकाळी ७. ३० वाजता पोहोचेल. 01166 विशेष १६ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरपर्यंत ४ सेवा दर मंगळवारी मंगळुरु जंक्शनहून रात्री १०.२० वाजता सुटेल आणि लो. टिळक टर्मिनसला दुस-या दिवशी सायंकाळी ६. ३० वाजता पोहोचेल.
या विशेष गाड्यांसाठी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कानकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल, ठोकूर हे थांबे असतील.
विशेष गाडी क्र. 01165 चे विशेष शुल्कासह बुकिंग १८ जुलै २२ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in येथे भेट द्या किंवा ‘एनटीईएस अॅप ’डाउनलोड करा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.