अनधिकृत सात शाळांवर कारवाईची कुऱ्हाड

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील सात अनधिकृत शाळा घोषित करण्यात आल्या होत्या. सदर शाळांवर कारवाई झाली नसल्याने काही पालकांनी आपल्या पाल्यांना या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश दिला.

याबाबत शिक्षण उपायुक्त अजित मुठे यांना तक्रारी प्राप्त झाल्याने सदर सात अनधिकृत शाळांवर अनधिकृत बॅनर शिक्षण विभागातर्फे लावण्यास सुरुवात झाली आहे. आज (गुरुवार) शिक्षण विभागातील कर्मचारी विजय वाकडे यांनी भर पावसात मिरारोड येथील दोन अनधिकृत शाळांवर बॅनर लावले असून लवकरच इतर शाळांवर अशीच कारवाई करण्यात येणार असून शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे.