श्रीगणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या ७४ विशेष गाड्या

ठाणे : मध्य रेल्वेने दरवर्षीनुसार आगामी श्रीगणेश उत्सव २०२२ साठी ७४ श्री गणेशोत्सव विशेष गाड्या चालवण्याचाा निर्णय घेतला आहे. गरजेनुसार आणखी काही गणपती विशेष गाड्या येत्या दिवसांत जाहीर केल्या जातील.

मुंबई-सावंतवाडी दैनिक विशेष (४४ सेवा) ०११३७  छशिमटहून २१ऑगस्ट  ते १९ सप्टेंबरपर्यंत दररोज मध्यरात्रीनंतर १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. ही विशेष गाडी सावंतवाडी रोडहून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत दररोज २ .४० वाजता सुटेल आणि छशिमटम येथे दुस-या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ हे थांबे असतील.

पनवेल-कुडाळ/थिवि-पनवेल विशेष (६ सेवा) : ०११४३ विशेष ट्रेन पनवेलहून २८ ऑगस्ट २२, ४ सप्टेंबर २२ आणि ११ सप्टेंबर २२ रोजी  ५ वाजता सुटेल आणि कुडाळला त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. ०११४४ विशेष ट्रेन थिविमहून २७ ऑगस्ट २२/३सप्टेंबर २२ आणि १० सप्टेंबर २२ रोजी  दुपारी २. ४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुस-या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल. रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ (फक्त ०११४४ साठी), सावंतवाडी रोड (फक्त ०११४४ साठी) असे थांबे असतील.

नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (१२ सेवा) ०११३९ विशेष नागपूरहून २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर कालावधीत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी रोजी दुपारी ३.०५ वाजता  सुटेल आणि मडगावला दुस-या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता  पोहोचेल. ०११४० विशेष मडगावहून २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी रात्री ७ वाजता सुटेल आणि नागपूरला दुस-या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल. वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भूसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर  रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी असे थांबे असतील.

पुणे-कुडाळ विशेष ६ सेवा : ०११४१ विशेष पुण्याहून २३ ऑगस्ट २२, ३० ऑगस्ट २२ आणि ६ सप्टेंबर रोजी ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळला त्याच दिवशी दुपारी २ वाजता  पोहोचेल. ०११४२ विशेष कुडाळहून २३ ऑगस्ट २२, ३० ऑगस्ट २२ आणि ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुस-या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल. लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग हे थांबे असतील.

पुणे-थिवि/कुडाळ-पुणे विशेष (६ सेवा) : विशेष पुण्याहून २६ आॅगस्ट २२, २ सप्टेंबर २२ आणि ९ सप्टेंबर रोजी  सायंकाळी ५ .३० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुस-या दिवशी ११.४० वाजता  पोहोचेल. ०११४६ विशेष कुडाळहून २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि पुण्याहून दुस-या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल. चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड (फक्त 01145 साठी), थिवि (फक्त ०११४५ साठी) हे थांबे असतील.