ठाणे : ‘आता तरी ये रे , ये रे पावसा’ अशा आर्त हाका बच्चेकंपनींनी ‘वरुणराजा’ला मारल्यानंतर तो बरसल्यामुळे येत्या रविवारी धम्माल करण्याचे बेत आखले असताना, मध्य रेल्वेने रविवारचा ‘मेगा ब्लॉक’ जाहीर करुन असंख्य पर्यंटकांना त्यांचे बेत ‘ब्लॉक’ करावे लागले आहेत. ३ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी ‘म.रे’ ला मेगा ब्लॉक करावा लागला.
छशिमट-विद्याविहार अप-धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५., छशिमटहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणा-या धीम्या गाड्या छशिमट ते विद्याविहार दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपरहून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणा-या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते छशिमट दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ, भायखळा स्थानकांवर थांबतील.
पनवेल- वाशी अप/ डाउन हार्बर मार्गावर स. ११.०५ ते सायं. ४.०५ पर्यंत.ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित होणार नाहीत) पनवेलहून सकाळी १०.३३ ते दु. ३.४९ पर्यंत सुटणा-या छशिमटकडे जाणा-या अप हार्बर सेवा आणि छशिमट येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणा-या अप हार्बर रद्द राहतील. पनवेलहून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर सेवा आणि ठाण्याहून सकाळी १०.०१ ते दु. ३.२० पर्यंत पनवेलसाठी सुटणारी डाऊन ट्रान्सहार्बर रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानची उपनगरीय सेवा आणि ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छशिमट- वाशी सेक्शनमध्ये विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील.