गणेशोत्सवासाठी कोकणात २५०० गाड्या

ठाणे, उरण, पनवेल, कल्याण, विठ्ठलवाडी, नालासोपारा, वसईहून एसटी सेवा

ठाणे : येत्या ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून, बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल, परळसह ठाणे, उरण, पनवेल, कल्याण, विठ्ठलवाडी, नालासोपारा, वसई व अन्य ठिकाणांहून २५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

२५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील आणि ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील. या बसेसचे आरक्षण बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेतस्थळावर, मोबाईल अ‍ॅपद्वारे, खाजगी एजंट व त्यांच्या अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरुपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.

ठाणे १ विभागात भाईंदर, लोकमान्य नगर, श्री नगर, विटावा, नॅन्सी कॉलनी (बोरिवली), मालाड, डहाणूकर वाडी/ चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्प सिद्धी गणेश मंदिर (गोरेगाव), ठाणे २ विभागात भांडुप पश्चिम आणि पूर्व, मुलुंड पूर्व. विठ्ठलवाडी (बदलापूर / अंबरनाथ), कल्याण विभागात डोंबिवली पश्चिम आणि पूर्व. नालासोपारा, वसई आगार, अर्नाळा आगार असणार आहेत.

मुंबई सेंट्रल आगार अंतर्गत साईबाबा, काळाचौकी, गिरगाव, कफ परेड, केनेडी ब्रिज, काळबादेवी आणि महालक्ष्मी. परळ आगार अंतर्गत सेनापती बापट मार्ग, दादर, मांगल्य हॉल, जोगेश्वरी, कुर्ला नेहरूनगर आगार अंतर्गत बर्वे नगर, सर्वोदय हॉस्पिटल (घाटकोपर),  टागोर नगर विक्रोळी, घाटला (चेंबुर), डी.एन. नगर अंधेरी, गुंदवली अंधेरी, सांताक्रुज (आनंदनगर), विलेपार्ले, खेरनगर बांद्रा, शीव ही वाहतुकीची ठिकाणे आहेत.