ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला असून आज ५१४ रुग्णांची भर पडली आहे तर २५२जण कोरोनामुक्त झाले आहेत.
महापालिका हद्दीत माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक २१५ रूग्ण सापडले आहेत. ८१जण वर्तकनगर, ५६ उथळसर, ४५ लोकमान्य-सावरकर, ३० कळवा आणि २७ रूग्ण वागळे प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात २६ रुग्णांची भर पडली आहे. दिवा प्रभाग समिती भागात १७ आणि सर्वात कमी चार रूग्ण मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नोंदवले गेले आहेत. १३जणांच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८५,४७४ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. रुग्णालयात आणि घरी २,३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसून आत्तापर्यंत २,१३२ जणांचा मृत्यू झाला आहे.महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,७८५ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ५१४जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ५९,४११ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८९,९८४जण बाधित सापडले आहेत.