ठाणे : टोरंट कंपनीमार्फत बसवलेल्या नवीन वीज मीटरवर ग्राहक अचूक मीटर रिडींगमुळे समाधानी असल्याचे दृश्य कळवा-दिवा-मुंब्रा परिसरात दिसत आहे.
टोरंट कंपनीने १ मार्च २०२० पासून कळवा-मुंब्रा-दिवा परिसरासाठी राज्य वीज वितरण कंपनीचे फ्रँचाईजी म्हणून काम सुरू केले. या तीनही क्षेत्रात मिळून तीन लाखावर ग्राहक आहेत. वीज वितरणात सुधारणा व्हावी यासाठी टोरंट कंपनीने अनेक कामे सुरू केली. यात जुने केबल्स बदलणे, फिडर बदलणे, नवीन उच्च क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसवणे आदी कामे सुरू केली. यामुळे वीज पुरवठ्यात सुधारणा दिसून आली. सर्वत्र एकसमानता रहावी, तसेच वीज मीटरबाबत असलेल्या तक्रारी कमी व्हाव्यात या हेतूने वीज नियामक आयोगाच्या निर्देशांनुसार असलेले आधुनिक मीटर सर्वत्र बसवण्यास टोरंट कंपनीने सुरूवात केली. नवीन मीटरमध्ये रिडींग अचूक येत असून दोन महिन्यांचा वीज वापराचा रेकॉर्ड देखील त्यात तपासता येऊ शकते. दोन महिन्यांचा प्रत्येकी तासाच्या युनिटसचा वापराची नोंद या मीटरद्वारे तपासता येऊ शकते.
जुन्या मीटरमध्ये फक्त रिडींगची सोय आहे मात्र नक्की कोणत्या वेळेला किती युनिट वापरले त्याची माहिती मिळत नाही. जुन्या खराब मीटरमधून अचूक रिडींग न होता ग्राहकाला जास्त युनिट देखील नोंदवले जाऊ शकतात.
केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, 2006 (“CEA विनियम”), कलम 4(2) आणि कलम 18(2) नुसार, प्रत्येक वीज वितरण कंपनीने ग्राहकांच्या आवारात बसवलेले मीटर अचूक असल्याची खात्री करणे आणि नवीनतम तंत्रज्ञानानुसार असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. ज्या मीटर्स मध्ये नसेल, अशा मीटर्सना वेळोवेळी कंपनीने स्वतः किंवा ग्राहकांच्या विनंतीनुसार बदलणे आवश्यक आहे. त्यानुसार, बिलिंगची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, टीपीएलने एसएमके परिसरात स्थापित केलेले जुने मीटर टप्प्याटप्प्याने बदलण्याची योजना आखली आहे.
नवीन मीटरमध्ये मात्र प्रत्येक तासाचे युनिट तपासण्याची सोय आहे. तसेच या मीटरमध्ये एक ट्रीप बटण देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने देण्यात आले आहे. लोड कमीजास्त झाल्य़ास घरातील उपकरणांना धोका होऊ नये यासाठी याचा फायदा होऊ शकतो. नवीन मीटरमुळे ग्राहकाला तो जेवढा वापर वीजेचा करणार तेवढ्याच युनिटचे अचूक बिल ग्राहकाला मिळत आहे.