ठाण्यात कोरोनासाजे नवीन १६५ रुग्ण

ठाणे: शहरातील कोरोना रुग्ण वाढीचा आलेख चढाच असून आज १६५ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ९३जण रोगमुक्त झाले आहेत.

महापालिका हद्दीत माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात ६४ रुग्णांची भर पडली आहे. ३४जण वर्तकनगर, २१ उथळसर आणि १६ रूग्ण लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती भागात वाढले आहेत. कळवा येथे नऊ रूग्ण सापडले आहेत. प्रत्येकी सहा रूग्ण दिवा, नौपाडा-कोपरी आणि वागळे प्रभाग समिती परिसरात नोंदवले गेले आहेत तर सर्वात कमी तीन रुग्णांची नोंद मुंब्रा प्रभाग समितीमध्ये झाली आहे.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ९३जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८२,५६८ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १,३२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ७४२ नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये २६५जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ४०,८२८ ठाणेकरांनी चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८६,०१८ जण बाधित मिळाले आहेत.