प्रभाग रचना जाहीर
बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी आज गुरुवारी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.
बदलापुरात काही किरकोळ बदल करून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली, तर अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात काही बदल करून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. आज दुपारी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. हरकतदारांनी ज्या हरकती घेतल्या होत्या त्यांचा विचार झालाच नाही अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
अंबरनाथमध्ये सायंकाळी उशिरा प्रभाग रचना जाहीर करण्यात आली बराच विलंब झाला. जाहीर झालेल्या प्रभाग रचनेमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यात काही प्रभागच थेट बदलण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर काही हरकतदार यांनी हरकतीच्या दिवशी गैरहजेरी लावली होती, त्या गैरहजर हरकतदारांच्या हरकतींचा देखील विचार केल्याचे आढळून येते. प्रभाग रचना दिसत आहे. तर ज्या हरकतदारांनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रभाग रचना झाली नाही अशी हरकत घेतली ज्या हरकतदारांनी घेतली होती त्या हरकतिना बगल देण्याचे काम निवडणूक आयोगामार्फत करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.