भाईदर : अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवक जनतेच्या पैशातून देशातील विविध पर्यटन स्थळी मौजमजा केल्याचे या आधीही उघडकीस आले आहे. पालिकेची मुदत ऑगस्ट २२ मध्ये संपत असतानाही नगरसेवक व अधिकाऱ्यांना मात्र पर्यटनस्थळी अभ्यास दौऱ्यावर जाण्याचाचा हव्यास काही सुटता सुटत नाही असे आढळून येत आहे.
वृक्ष प्राधिकरण समितीसह काही पदाधिकारी अभ्यासासाठी मेघालयच्या दौऱ्यावर गेले आहेत. महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीया मेघालय दौऱ्यासाठी ६ जून सोमवारी पहाटे भाजपाचे सभागृह नेता प्रशांत दळवी स्थायी समिती सभापती शाह नगरसेवक आनंद मांजरेकर, अनिल विराणी, गणेश भोईर विरोधी पक्ष नेता धनेश पाटील नगरसेवक प्रवीण पाटील अनंत शिवसेनेचे नगरसेवक अनिल सावंत यासह उपायुक्त संजय शिंदे उद्यान अधिक्षक नागेश वीरकर विमानाने रवाना झाले आहेत.मेघालय येथील विविध ठिकाणी भेट देवून सर्वजण १२ जून रोजी दोऱ्यावरून परत येणार आहेत. दौऱ्याच्या ठिकाणी आलिशान हॉटेल मध्ये नगरसेवकांचे वास्तव्य असून तेथील पर्यटन स्थळे पाहणी केली जाणार आहेत. विशेष म्हणजे वृक्षप्राधिकरण विभागाचे सदस्य नसलेले पदाधिकारी देखील टूरमध्ये सहभागी आहेत. महापालिका सदस्यत्वाची मुदत संपायला दोन महिने असताना उधळपट्टीचा अट्टहास नगरसेवक अधिकारी यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक या अगोदरही नगरसेवकांचे दौरे शिमला-मनाली डेहराडून म्हैसूर ते सिक्कीम दार्जिलिंग राजस्थान, गोवा आदी अनेक पर्यटन स्थळी जनतेच्या पैशातून अभ्यासाच्या नावा खाली भेटी देवून झालेली आहेत. या अभ्यास दौऱ्याचे अहवाल सुद्धा सादर केले जात नसून त्यातून शहराच्या हिताचे कोणतेही प्रयत्न आज पर्यंत काही नगरसेवकांना साध्य झालेले नाही. मात्र नगरसेवकांनी आलिशान तारांकित टूर- टूर करीत जीवाची मजा करून घेतली आहे हे लपून राहिले नाही.
आता सुद्धा शहरात पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असताना वृक्ष प्राधिकरणच प्रचंड प्रमाणात झाडे तोडायची परवानगी देऊन झाडांची कत्तल होत असताना मेघालय दौऱ्या साठी दहा लाखांचा खर्च करीत असल्याने मत व्यक्त होत आहे. मेघालय मधील वातावरण आणि मिराभाईंदर शहरातील वातावरण यामध्ये बराच फरक असून अभ्यास दौऱ्यासाठी पर्यटन स्थळे का सुचतात? हे न उलगडणारे कोडे आहे.