मुरबाडमधील ४८ ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे आरक्षण जाहीर

मुरबाड : मुरबाड तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, आज मुरबाडचे तहसीलदार संदिप आवारी यांनी तालुक्यातील जवळपास 48 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर केले आहे.

आज आरक्षण जाहीर केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये भोरांडे, मोरोशी, फांगुलगव्हान, खुटल (बा.) वाल्हिवरे, मेर्दी, करचोंडे, शिरोशी, बुरसुंगे, वेळुक, शेलगाव, उमरोली बु, किसळ, इंदे, सायले, दहिगाव-चाफे, प-हे, धसई, उमरोली खु., महाज, मिल्हे, खेवारे, कळंभाड भो, एकलहरे, सिंगापूर, पळू, रामपूर, नांदगाव, आंबेळे खु., पवाळे, भालुक, कोळठण, असोळे, साज ई, किशोर, सासणे, तोंडली, कान्होळ, साकुर्ली, मोहघर, कोळोशी, खोपिवली, चासोळे, साखरे, वडवली, माळ, वैशाखरे या ग्रामपंचायतींचा समावेश असून आजच्या या आरक्षण सोडतीसाठी 24 अधिका-यांच्या नेमणुका करुन प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदरचे आरक्षण या वेळेत काढण्यात आले.