ठाण्यात मे महिन्यात डेंग्यूचे तीन तर मलेरियाचे 28 रुग्ण

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मे 2022 मध्ये डेंग्यूचे संशयित रुग्णसंख्या 10 आणि निश्चित निदान झालेले एकूण तीन रुग्ण आहेत तर मलेरियाचे 28 रुग्ण आढळून आले व चिकनगुनियाचे संशयित  रुग्णसंख्या एक असून निश्चित निदान केलेली रुग्णसंख्या शून्य आहे.

यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 24747 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 377 घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण 35793 कंटेनरची तपासणी केली असता 432 कंटेनर दूषित आढळून आली.

या अनुषंगाने दरम्यानच्या कालावधीत कार्यक्षेत्रात 50 हॅण्डपंप, ट्रॅक्टर्स-10, ई रिक्षा सहा, 10 बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात 1729 ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅण्डमशीनद्वारे 10758 ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली, तसेच नऊ ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिताली हुमरसकर यांनी नमूद केले.