बाळकुमजवळील रस्ता खुला करणार – आमदार संजय केळकर

त्रस्त वाहन चालकांना दिलासा

ठाणे: नाशिक हायवेवर साकेतजवळ सुरु असलेल्या हायवे रुंदीकरणाच्या कामामुळे साकेत, रुस्तमजी, राबोडी येथील वाहनधारकांना परतीला मोठा वळसा पडत होता. त्याबाबत उपाय योजना करण्यासाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी हायवे ओथॉरटिचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत पहाणी दौरा केला.

हायवेला लागून बाळकुमच्या बाजूचा रस्ता बंद होता. तो सुरु करण्याचा पर्याय वाहनधारकांना दिलासा देऊ शकतो व वाहतूक कोंडी कमी होऊ शकते असे आ. केळकर यांनी पाहणी दौऱ्यावेळी सुचवले. या सूचनेला संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यामुळे पुढील आठवड्यात मुंबईकडून येताना या एकेरी रस्त्याचा वापर करता येईल, असे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.

यावेळी पाहणी दौऱ्यात आ. केळकर यांच्यासह ऍड. अलकेश कदम, योगेश भोईर, दिलीप कंकाळे, प्रवीण रानडे, सुरेश पाटील, रवी रेड्डी, तन्मय भोईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.