ठाणे ग्रामीण क्षेत्रात मनाई आदेश लागू

ठाणे : ठाणे जिल्हयातील पोलीस अधिक्षक, ठाणे (ग्रामीण) यांचे कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था रहावी तसेच जनजीवन सुरळीत रहावे,यासाठी  ठाण्याचे जिल्हादंडाधिकारी  राजेश नार्वेकर यांनी 30 मे 2022 रोजीचे 12.00 वाजेपासून ते 14 जून 2022 रोजीचे 12 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) खालील कृत्यासाठी मनाई आदेश लागू केले आहेत.

या कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले  दंडे, सोटे, बंदूका, सुरे, लाठ्या अथवा काठया अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा लोकांत प्रचार करणे. व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे. यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे, सॉंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकांत प्रचार करणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे, असे या आदेशात नमूद केले आहे.