महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती ( महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मंगळवार ३१ मे, २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

बुधवार १ जून, २०२२ रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. बुधवार १ जून,२०२२ ते सोमवार ६ जून,२०२२ ( दुपारी ३ वा.पर्यंत ) आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असून हरकत व सूचना महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात.