ठाणे: शहरातील कोरोना रुग्णांची वाढ सुरूच असून आज २८ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर १६जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचा आकडा दीडशेहून जास्त झाला आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी १६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,८५९जणांनी कोरोनावर मात केली आहे तर रुग्णालयात आठ आणि घरी १४९ अशा १५७ जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ६६० नागरिकांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यामध्ये २८जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख २६,५५६ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८४,१४६जण बाधित मिळाले आहेत.