ठाण्यात कोरोनाचे नवीन २४ रुग्ण

ठाणे: शहरातील कोरोना रूग्ण वाढीने हळूहळू वेग घेतला असून आज २४ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर अकरा जण रोगमुक्त झाले आहेत.

रुग्णालयात चार आणि घरी १२३ अशा १२७जणांवर उपचार सुरू आहेत तर ११ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,८३४जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१३०जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ६५५ नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये २४जण बाधित सापडले असून आत्तापर्यंत २४ लाख २५,२३४ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८४,०९१जण बाधित मिळाले आहेत.