मुंबईच्या सौंदर्यात भर घालत भिंतीचित्रांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला ‘प्रवाह पिक्चर’ने दिला मानाचा मुजरा!

दर्जेदार मराठी चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन आलेल्या ‘प्रवाह पिक्चर’ या वाहिनीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबवला.

मुंबईच्या सौंदर्यात भर घालत भिंतीचित्रांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला ‘प्रवाह पिक्चर’ने दिला मानाचा मुजरा!

या अनोख्या उपक्रमाअंतर्गत मुंबईतील तुलसी पाईप मार्गाजवळ मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या सिनेमांचं भव्यदिव्य भिंतीचित्र साकारण्यात आलं. गेला महिनाभर अनेक चित्रकारांचा ताफा या निस्तेज भिंतीमध्ये जीव ओतण्यासाठी मेहनत घेत आहे.

मुंबईच्या सौंदर्यात भर घालत भिंतीचित्रांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला ‘प्रवाह पिक्चर’ने दिला मानाचा मुजरा!

मराठी कलाकारांची हुबेहुब चित्र साकारत या चित्रकारांनी तुलसी पाईप मार्गाचं रुप पालटलं आहे. ही बोलकी भिंतीचित्र सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत.

मुंबईच्या सौंदर्यात भर घालत भिंतीचित्रांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला ‘प्रवाह पिक्चर’ने दिला मानाचा मुजरा!

अभिनेते भरत जाधव, अंकुश चौधरी आणि प्रतिभावंत दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खास उपस्थितीत ह्या भव्यदिव्य भिंतीचित्रांचं अनावरण करण्यात आलं.

सध्या  डिजिटलचा जमाना असला तरी हाताने रंगवलेल्या या भिंतीचित्रांची मजा न्यारीच आहे. यानिमित्ताने अनेक चित्रकारांना पुन्हा एकदा रोजगाराची संधी मिळाली आहे. मुंबईच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या भिंतीचित्रांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा देण्याचा प्रवाह पिक्चर वाहिनीचा प्रयत्न आहे.