कल्याण: फरार होत सतत चकवा देत असतानाच ड्रग तस्कर जेठालाल चौधरी एका ठिकाणी आला असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्याने या ड्रग्स माफियावर पोलिसांनी झडप घालत जेरबंद केले आहे.
बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वर्षापूर्वी अमली पदार्थ विकणाऱ्या चार जणांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात जेठालाल फरार होता. पोलीस आपल्यावर असलेला गुन्हा विसरले असल्याचे जेठालाल याचा समज झाल्याने तो पुन्हा सक्रिय होत आपला तस्करीचा कारभार करू लागला होता. दोन वर्षापूर्वीच या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेल्या गुन्ह्यात जेठालाल हवा असल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र एका डोळ्याने अपंग असलेल्या जेठालाल वेषांतर करून शहर परिसरात फिरत होता. याबाबत बाजारपेठ पोलिसांना जेठालाल येणार असल्याची पक्की खबर लागली असता मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.