माथेरान-अमन लॉज शटल सेवेमुळे पर्यटनाला चालना

तीन लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास केला

ठाणे: माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवाशांसाठी शटल सेवेसह मध्य रेल्वेने हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

मध्य रेल्वेने २०२१-२०२२ (एप्रिल ते मार्च दरम्यान) ३,०६,७६३ प्रवाशांची वाहतूक केली आहे आणि अमन लॉज आणि माथेरान दरम्यान आठवड्याच्या दिवशी एकूण १६ सेवा आणि वीकेंडला २० सेवांसह ४२,६१३ पॅकेजेसची वाहतूक केली आहे. पर्यटकांना आरामदायी प्रवास देण्यासोबतच, या सेवा स्वस्त आणि जलद साहित्याची वाहतूक करण्यासही मदत करतात.

एप्रिल-२०२१ ते मार्च-२०२२ या कालावधीत रु.१.८२ कोटी महसूल मिळाला आहे. यामध्ये रु. १.७८ कोटी प्रवासीसेवेतून उत्पन्न आणि रु. ३.२९ लाख पार्सल उत्पन्नाचा समावेश आहे.

माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हिवाळी सुट्टी हा सर्वात योग्य असतो. नोव्हेंबर-२०२१ हा महिना रू. २७.६५ लाख प्रवासी उत्पन्नासह ४२०२१ प्रवासी घेऊन अव्वल स्थानावर आहे आणि त्यानंतर डिसेंबर-२०२१ महिन्यात २७.११ लाख प्रवासी उत्पन्नासह ४३,५०० प्रवाशांनी प्रवास केला आहे.

ही आकडेवारी या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते. मध्य रेल्वेने हे ठिकाण केवळ प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय केले आहे. हे टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करते आणि त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत मग्न होते.