ठाणे: शहरातील कोरोना रूग्णवाढ सुरूच असून आज १२ नवीन रुग्णांची भर पडली तर पाच जण रोगमुक्त झाले आहेत.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,६३३ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. रुग्णालयात तीन आणि घरी ५९ रूग्ण अशा ६२ जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत २,१३०जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ४७७ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये १२जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख १४,०९४ नागरिकांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,८२५जण बाधित मिळाले आहेत.