ठाणे : ठाणे शहरातील ४० ते ४५ मजल्यांच्या इमारतींना आग लागल्यास ही आग विझवण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात सहा ‘हाय राईझ फायर फायटींग व्हेईकलचा समावेश करण्यात आला आहे. ही वाहने २०० मीटरपर्यंत पाण्याच्या फवारा मारू शकतात.
ठाण्यात एकीकडे उंच इमारती बांधण्याची परवानगी देण्याऱ्या ठाणे महापालिकेकडून या इमारतींच्या सुरक्षिततेकडे मात्र सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे . यापूर्वी गिरीजा हाईट्स आणि रोडाज या दोन उंच इमारतींमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांनी हे उघड झाले आहे. सध्या पालिका प्रशासनाकडे २५ मजल्यांवरील इमारतींना आग लागल्यास ती विझवणारी सक्षम यंत्रणा नाही. नव्या युनिफाईड डीसीपीआरमुळे इमारतींवरील मर्यादा हटल्याने भविष्यात मोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्याच्या सुरक्षेचा विचार करून सहा ‘हाय राईझ फायर फायटींग व्हेईकलची खरेदी करण्यात आली आहे. या प्रकारच्या फायर वाहनांचा अग्निशमन वाहन ताफ्यात समावेश झाल्याने अग्निशमन विभागाची वाहन क्षमता वाढणार आहे. पर्यायाने अग्निशमन दलाची कार्यक्षमता वाढणार आहे.
हायराईझ फायर फायटींग वाहनाचे वैशिष्ट्य
* २०० मीटर उंची पर्यंत पाण्याचा प्रवाह नेणारे अद्ययावत तंत्रज्ञान
* वॉटर टैंक क्षमता १२ हजार लिटर
* २०० मीटर उंचीपर्यंत स्थिर गती व दाबाचा पाण्याचा प्रवाह
* लाईटवेट होज पाईप व उच्च दाबावर कार्य करण्यास सक्षम
* अद्ययावत कंट्रोल पैनल
* फायर फायटींग वॉटर पंप दोन हजार ते सहा हजार एल.पी.एम.