राकेश पुत्रनची चमकदार कामगिरी
ठाणे : टाइम्स ऑफ इंडियाच्या राकेश पुतरनने अवघ्या ५३ चेंडून धडाकेबाज ७० धावांच्या जोरावर ४६ व्या ठाणेवैभव वासंतिक क्रिकेट करंडक क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये संघाने धडक मारली आहे. त्याला शेखर कदम याची मोलाची साथ मिळाली. टाइम्स ऑफ इंडियाच्या टीमने डब्ल्यू एन एस ग्लोबल टीमचा ७ गडी आणि २ चेंडू राखून पराभव केला.
ठाण्याच्या सेंट्रल मैदानात खेळल्या गेलेल्या सामन्यात राकेश पुतरनच्या तडाखेबंद फलंदाजीसमोर डब्ल्यू एन एस ग्लोबल टीमच्या गोलंदाजांचा टिकाव लागला नाही. राकेशने ५३ चेंडूत ७० धावांची तडाखेबंद फलंदाजी केली. त्यात त्याने चार चौकार आणि पाच षटकार लगावले.
डब्ल्यू एन एस ग्लोबल टीमने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १६९ धावांचे विशाल लक्ष दिले. ज्ञानसागर पाटील याने ६३ चेंडूत ९६ धावांची शानदार खेळी केली. यात त्याने १८ चौकार लगावले. त्याला सुरूवातीला आदित्य निकम याने २३ धावा करत चांगली साथ दिली.
टाइम्स ऑफ इंडिया संघाने १६८ धावांचा पाठलाग करताना १९.४ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात १७० धावा करत फायनलमध्ये दिमाखात धडक दिली. ओपनर परितोष मोहिते (१३) आणि चिंतन गडा (२०) यांनी चांगली सुरूवात करून दिली. अनिर्बन चौधरी याने ११ धावा केल्या.
सामन्याचा संक्षिप्त धावफलक
डब्ल्यू एन एस ग्लोबल टीम : २० षटकात ४ बाद १६८ (ज्ञानसागर पाटील ९६, आदित्य निकम २५, पंकज सावंत ४-३०-२, सत्यजित बॅनर्जी ४-३२-१ पराभूत विरुद्ध
टाइम्स ऑफ इंडिया : १९ षटकात ४ बाद १७०( राकेश पुतरन नाबाद ७०, शेखर कदम ३५, चिंतन गडा २०, अर्निबन चौधरी ११, मंदार, अशितोष आणि आदित्य प्रत्येकी एक विकेट )