समाज माध्यमांवर आणि खास करुन ट्विटरवर जी मंडळी खूप सक्रीय आहेत त्यांना टेस्लाचे एलन मस्क यांनी या प्रभावी होत चाललेल्या माध्यमाची खरेदी के ल्याने फार आश्चर्य वाटू नये. पन्नास वर्षीय मस्क यांचे बाजारमूल्य २६,४६० कोटी डॉलर्स आहे. रुपयांत त्यांचे रुपांतर अगदी ७० रुपयांनी करावयाचे झाल्यास करता येऊ शके ल. परंतु त्यामुळे डोळे अधिकच पांढरे होण्याची शक्यता अधिक! असो. तर या पृथ्वीवरील गरीबातल्या गरीब माणसाला आणि जो आताच श्रीमंत आहे त्याला मस्क होण्याचे स्वप्न पाहत झोप चांगली येऊ शके ल. विषय मस्कच्या विलक्षण श्रीमंतीचा नसून त्यानेट्विटर का विकत घेतले या भूमिके चा आहे. साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या या व्यवहाराकडे के वळ आर्थिक दृष्टिकोनातून न पाहता त्यामागचा मस्क यांचा हेतू तपासायला हवा. ट्विटरचा वापर करणाऱ्या ग्राहकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचंड वापर होत असतो. अनिर्बंध अशी मतमतांतरे या माध्यमाद्वारे प्रकट होत असतात. व्यक्त होण्याची इतकी व्यापकता अन्य कोणत्याही माध्यमांद्वारे होत नाही हे ओळखून असलेल्या मस्कने ते खरेदी के ले यामागे निश्चितच दरगामी ू विचार असणार. तो साधारणत: असा आहे की जगातील कानाकोपऱ्यातून ट्विटरचा वापर करणार्या नागरिकांच्या विचारसरणीचा अं दाज बांधता येऊ शके ल. जागतिकीकरणामुळे वैश्विक खेड्याची संकल्पना मान्य झाली असताना या ‘खेडयातील’ लोकांची संस्कृती, जीवनशैली, भाषा, आशा-आकांक्षा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विचारसरणी जगाचा व्यवहार ठरवणार असते. हा व्यवहार नियंत्रित करण्याची तर मस्क यांची महत्वाकांक्षा नसेल? आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि त्याचा सर्वसामान्य जनतेला वापर करता यावा या उद्दिष्टाने मस्क यांनी वीजेवर चालणारे चारचाकी वाहन बाजारात आणले आणि तो जगातील सध्या दोन नंबरचा श्रीमंत माणूस आहे. वीजेवर चालणारी गाडी हा क्रांतीकारक शोध लावून त्यांनी आधुनिकतेला पर्यावरण संवर्धनाचा आयाम दिला. त्यातून त्याला या जगाची काळजी वाटत असावी असे वाटते. म्हणजे पारंपारिक इंधनामुळे होणारे प्रदषणू आणि हवामान बदलापासून प्राणवायूचा ऱ्हास अशा चिंता वाटणाऱ्या विषयात त्यांनी हात घातला. आता ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी जगाच्या वैचारिक शक्तीचा कसा उपयोग करता येईल असा विचार सुरु के ला आहे असे म्हणायला वाव रहातो. मस्क यांचा गंभीर दृष्टीकोन आणि प्रसंगी ट्विटरमुळे आलेला सवंगपणा यांचा ताळमेळ घातला तर मस्क यांना ट्विटरचे मालक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मात्रा वाढवताना त्याला शिस्तीचे कुं पण घालावे लागेल. आधुनिकतेबरोबर प्रगल्भता आली तरच ट्विटरसारखे माध्यम प्रभावी ठरेल अन्यथा त्याचे रुपांतर रिझवणाऱ्या खेळण्यात होईल! ट्विटरची मस्करी कु स्करी होऊ नये म्हणजे मिळवले.