ठेकेदाराची आत्महत्या

कर्नाटकातील एका ठे के दाराच्या संशयास्पद  मृत्यूमुळे वादंग निर्माण झाला आहे. या कथित आत्महत्येस ते थील एका मंत्र्याच्या सहकाऱ्यांचा हात असल्यामुळे विरोधी पक्ष या मृत्यूचे भांडवल करणार यात वाद नाही. हा मुद्दा सार्वजनिक चर्चेत आणणे आपण समजू शकतो परंतु त्याचे राजकारण होणे समर्थनीय नाही. मृत ठे के दाराला चार कोटी रुपयांचे एक सरकारी काम मंजूर झाले होते. त्यासाठी त्यांनी आर्थिक तजवीज के ली होती. परंतु काम सुरू झाल्यावर मंत्र्याचे दोन सहकारी पैशाची मागणी करू लागले आणि अखेरीस ती पूर्ण करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ठे के दाराला त्याचे देयक मिळाले नाही आणि तो अडचणीत सापडला. या चक्रव्युहात अडकलेल्या ठे के दाराला अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला. ठे के दार – राज्यकर्ते व्हाया अधिकारी असा हा लागेबांध्यांचा मार्ग असतो आणि तो सर्वांना सुपरिचित आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार अशाच प्रकारे होत असतो. सरकारी कामाची निविदा भरताना मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना त्यांचा हिस्सा द्यावा लागणार हे गृहीतच धरले जात असते. हा खर्चहिशोबात न घेणे मूर्खपणाचे असते. तरीही या प्रकरणातील ठे के दाराने हे टोकाचे पाऊल का उचलले असावे? सुरुवातीला स्वेच्छेने अशा रकमा दिल्या जात असे. त्याला बक्षिसी म्हटले जात. कधी पैशाने तर कधी भेटवस्तू देऊन हा चांगुलपणा दाखवण्यात ठे के दारांना काही वाटत नसे. कालांतराने बक्षिसीची जागा मोठ्या रकमेने घेतली आणि भ्रष्टाचाराला लाच असे म्हटले जाऊ लागले. बरे त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. कोणी किती मागावे आणि देणाऱ्याने किती द्यावे हे सारे सापेक्ष ठरू लागले. तरीही मूळ खर्चाच्या पाच ते दहा टक्के रक्कम अशी बेकायदेशीररित्या देवाणघेवाणीतून खर्च होऊ लागली. ताज्या प्रकरणात ती ४० टक्के पोहोचली होती आणि त्यामुळेच ठे के दाराला जीवनयात्रा संपवण्याशिवाय गत्यंतर राहिले नसावे. आत्महत्येची परिस्थिती निर्माण करणाऱ्यांचा बचाव होऊ शकत नाही. परंतु ही देण्याघेण्याची पद्धत सहमतीने सुरू होती हेही नाकारून चालणार नाही. ठे के दारमंडळी मोठी हुशार असतात. किं बहुना त्यांना
अशा क्लृप्त्या अधिकारीच देत असावेत. उदाहरणार्थ कमी दराने निविदा भरायला सांगायची, ती पदरात पाडून घ्यायची आणि मग खर्च वाढला या सबबीखाली अपेक्षित
दर मंजूर करून घेणे अशी एक मोडस -ऑपरंडी सर्वश्रुत आहे. काही ठिकाणी तर आपल्या मर्जीतील ठे के दारालाच काम मिळावे अशा अटी -शर्थींचा समावेश के ला जाऊ लागला. त्याउपर अनेक ठे के दार पुढे आले तर त्यांचे सिंडीके ट करण्याची प्र था सुरू झाली. हा सर्व व्यवहार विरोधी पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय सत्तारूढ मंडळी करू शकत नसतात. त्यामुळे कर्नाटकात पुढील काही दिवस आंदोलने वगैरे होतील आणि काही दिवसांनी ठे के दाराची आत्महत्या थंड बस्त्यात ठे वली जाईल.