शहरीकरणाच्या रेट्यात पर्यावरणाचा बळी जात असतो आणि पातकात राजकारण्यांचा सहभाग असतो. हा समाजाचा ठाम समज आहे आणि तो चुकीचा आहे असेही म्हणता येणार नाही. झाडांची कत्तल असो की प्रदषण वाढवणारे कारखाने असोत ू त्यांना नेत्यांचा आशीर्वाद असतो हे लपून राहिलेले नाही. शहरीकरण ही निकड झाली असली तरी त्यात उखळ पांढरे करून घेण्याची संधी दडलेली असते आणि ही संधी नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताशिवाय शक्य होत नसते. उखळ पांढरे होत असताना जे आर्थिक व्यवहार (अर्थात टेबलाखालून) होत असतात त्याने सर्वसामान्यांचे डोळे पांढरे पडावेत! या पार्भूमीवर प श्व र्यावरणाच्या बाजूने कोणी मंत्री उभा राहत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यातील झपाट्याने सुरू असलेल्या खारफु टींच्या ऱ्हासाचे प्रकरण चव्हाट्यावर आणले आहे. कळवा-मुंब्रा-खारेगाव या खाडीलगतच्या वसाहतींमध्ये गेल्या काही वर्षात बेसुमार शहरीकरण झाले आणि ही प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे साहजिकच खारफु टी कापून घरे थाटली जात आहेत. श्री. आव्हाड यांच्या मते कागदोपत्री ११० एकर खारफु टीचे क्षेत्र ७२ एकर झाले आहे आणि त्याबाबत सरकारी यंत्रणेने हस्तक्षेप के ला नाही तर जेमतेम सात एकर शिल्लक राहील, ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. त्याबाबतची सत्यता पटवण्याची गरज नाही कारण एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री ही माहिती देत आहे. त्यामुळे कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. ठाणे शहरातील तलाव जसे इतिहासजमा झाले तसे खाडीचे होऊ नये ही काळजी न वाटणे म्हणजे शहरीकरणाच्या फासात स्वतःला अडकवून घेण्यासारखे ठरते. खाडीचे पर्यावरणीय महत्व वेगळे सांगायची गरज नाही. खारफु टीचे अस्तित्व हे मोठे संरक्षण-कवच आहे. जमिनीची धूप रोखणे ते पशुपक्ष्यांसाठी अनुकू ल वातावरणनिर्मिती करणे हे खूप मोठे कर्तव्य ते बजावत असते. हवामान बदलाची झळ आपण सध्या सोसत आहोतच. अकाली पडणारा पाऊस, शहरातील नाल्यांमध्ये होणारे अतिक्रमण आणि त्यामुळे निचरा न झालेल्या पाण्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणे हे जणू नित्याचेच झाले आहे. निसर्गाला आव्हान देणारा मानव खाडी असोवा डोंगर मिळेल तेथे निवाऱ्याची सोय करत आहे. त्यामागेजसे अर्थकारण आहे तसे राजकारणही आहे. श्री. आव्हाड यांनी एका संवेदनशील विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यात राजकारण येऊ नये ही अपेक्षा. खारफु टी नष्ट झाली तर शहरे कायमची भूजलावरून पुसली जाऊ शकतात. त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करावाच लागेल.