ठाण्यात कोरोनाचे आठ नवीन रुग्ण

ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असून आज आठ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर १२जण रोगमुक्त झाले आहेत.
महापालिका हद्दीत चार रुग्णांची भर माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात पडली आहे. दोन रूग्ण वर्तकनगर प्रभाग समिती भागात वाढले आहेत तर प्रत्येकी एक रूग्ण उथळसर आणि मुंब्रा प्रभाग समिती परिसरात नोंदवले गेले आहेत. उर्वरित पाच प्रभाग समितीमध्ये एकही रूग्ण नोंदवला गेला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १२जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,५९६ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात दोन आणि घरी ३३ अशा ३५जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१३०जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ३३४ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये आठ जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ११,५६२ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,७६१जण बाधित सापडले आहेत.