आमदार व जनता यांच्यात चर्चेचा दुरावा नको – आमदार कथोरे

मुरबाड : आमदार व जनता यांच्यात चर्चेचा दुरावा नको असे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी नडगावं येथे के ले.

दानबाव ग्रामपंचायतीच्या वतीने आदिवासी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन के ले होते. या कार्यक्रमात कथोरे बोलत होते. आदिवासी समाज अनेक  अडीअडचणींना सामोरा जात असतो पण त्या अडचणी आमदारांपर्यंत जात नाहीत. ही बाब आमदार कथोरे यांच्या लक्षात आल्याने आदिवासी बांधवांनी त्यांच्या अडीअडचणी माझ्यापर्यंत आणण्यापेक्षा मीच त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजवून घेतो अशी संकल्पना मांडली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी दानबाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच शेखर लोणे यांनी आदिवासी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन के ले होते.

या संवाद कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी त्यांना भेडसावणा-या अनेक अडचणी कथोरे यांच्याकडे मांडल्या. यात अनियमित पाणीपुरवठा,शैक्षणिक सुविधा, घरकु ल, स्मशानभूमी अशा अनेक समस्या मांडल्या. या समस्यांचे निरसन करण्यासाठी तात्काळ संबंधित अधिका-यांना फोन करून अडीअडचणी दूर करण्याच्या सूचना आमदारांनी के ल्याने आदिवासी बांधवांमध्ये विश्वासाचे व आनंदाने वातावरण झाल्याचे दिसून आले.

अनेक वर्ष या आदिवासी वाडीत एकाही लोकप्रतिनिधीने भेट दिली नाही. पण कथोरे आमदार झाल्यापासून चांगले रस्तेव ईतर योजनांचा लाभ घेता आला अशी माहिती आदिवासी बाधवा ं ंनी दिली.