राष्ट्रीय पेसापालो स्पर्धेत १४ राज्यातील ३३ संघांचा समावेश

कल्याण : १२ वी राष्ट्रीय पेसापालो स्पर्धा आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल मोहिली-अघई येथे २2 एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान उत्साहात सुरू झाली. या स्पर्धेत राजस्थान, के रळ, छत्तीसगड, मुंबई, गोवा, आं ध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, मध्य-प्रदेश दिल्ली, जम्-कमू ाश्मीर, हरियाणा, आसाम, महाराष्ट्र या राज्यांतून पुरुष, महिला व मुलामुलींची संघ सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आत्मा मालिक संकु लाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव, चेतन पागावाड, सचिव, पेसापालो फे डरेशन ऑफ इंडिया, दिनेश कु मार, सचिव राजस्थान, मारुती मरक्कम, सचिव छत्तीसगड, पद्मकु मार, सचिव के रळ, घनश्याम शिं दे, तांत्रिकी समिती प्रमुख, सुनील क्रॉडसर्स पंचप्रमुख तसेच आत्मा मालिक संकु लाचे स्पोर्ट टीचर शशिकला खडताळे, आर भास्करन हेही उपस्थित होते. शनिवारी झालेल्या पुरुष गटातील महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड स्पर्धेत महाराष्ट्राने १२ गुण आणि छत्तीसगड ने १ गुण बनविले. महाराष्ट्राकडून अंकित परब, ऋषीराज गोळे, विनोद सिंग, मुन्ना सिंग आणि छत्तीसगड तर्फे अवनीत टिग्गा, शेखर ज्वालाप्रताप यांनी आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन के ले.

महिला गटात महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड या सामन्या मध्ये महाराष्ट्र संघातर्फे रसिका संकपाल, दिव्या देवरे, तेजल शेलार आणि छत्तीसगड संघातर्फे सपना चंद्रकार, अनुप्रिया टिरकी, सैजल के रकट्टा यांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन के ले. राजस्थान विरुद्ध महाराष्ट्र पुरुष गटामध्ये राजस्थान तर्फे करन सैनी, विष्णू सैनी, रोहिदास
सैनी आणि महाराष्ट्र तर्फे एलेक्स चेट्टी, डॅनियल पेरुम्मली, श्याम चौधरी व आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे विश्वजीत कवटे, पंकज शिबडे व ऋतिक कु राडे यांनी  आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन के ले.

पेसापालो हा खेळ फिनलँड या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे व हा खेळ भारतामध्ये २०१२ पासून विविध राज्यांमध्ये खेळला जातो. २०१९ मध्ये याची विश्व स्पर्धा पुणे-महाराष्ट्र येथे संपन्न झाली व त्या स्पर्धेमध्ये भारताचा ४था क्रमांक आला होता व या खेळाचे इंटरनॅशनल ऑलम्पिक १९५२ मध्ये प्रात्यक्षिक दाखविले आहे. या खेळाचा स्कूलगेम फेडरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रात्यक्षिक झालेले आहे व हा खेळ लवकरच शालेय स्तरावर याचा समावेश होणार आहे.