ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा आज कमी झाला आहे. आज सहा रुग्णांची भर पडली तर पाच जण रोगमुक्त झाले आहेत.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी पाच जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,५७० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील २९१ नागरिकांची चाचणी घेतली. त्यामध्ये सहा रूग्ण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख १०,०३०जण बाधित मिळाले.