आसनगाव कासावीस

ऐन उन्हाळ्यात आठ दिवसात मिळते एकदाच पाणी

शहापूर : शहापूर तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणा-या आसनगांव ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाईने भीषण रूप धारण के ले आहे. उन्हाचा तडाखा वाढत असतांना आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्यामुळे जनतेतून आक्रोश व्यक्त के ला जात आहे.

शहापूर शहराला लागून असलेल्या आसनगांव परिसराचे सध्या मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. त्यामुळे रस्, वीज, पाणी ते अशा मुलभुत सुविधा नागरीकांना
उपलब्ध करुन घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. आसनगांवात पाणी टंचाईने परिसिमा गाठली असून गेल्या काही वर्षांपासून नागरीकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांतून एकदाच पाणी येत असल्याने काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागत आहे. त्यात पंप हाऊस येथील मोटारी सतत जळत
असल्यामुळे अनियमित स्वरुपाच्या पाणी पुरवठ्याचाही सामना करावा लागत आहे. खास करुन महिला वर्गाचे प्रचंड हाल हेत आहेत. परंतु प्रशासन या पाणी टंचाईबद्दल
कायम उदासिन राहीले असून ठोस उपाय योजना न करता तात्पुरत्या दरुस्तु ्या करुन वेळ मारुन नेत आहे. त्यामुळे आसनगांवचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे.

आ स न ग ा व च ी व ा ढ त ी लोकसंख्या पाहता ग्रामपंचायतीला सर्व वॉर्डात पाणीपुरवठा करणे अशक्य झाले आहे. काही वॉर्डात सात ते आठ दिवसानंतर एक दिवस पाणी मिळत आहे. यातही तांत्रिक अडचणीमुळे काही विभागात १५ दिवस पाण्यासाठी नागरीकांना वाट पाहावी लागत आहे. मोटार जळणे, जलवाहिनी फु टणे अशा कारणांमुळे पाणीपुरवठा सतत विस्कळीत होत असल्याने आसनगांवातील नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यात अनेक वर्षानंतर एकही पाणी योजना ग्रामपंचायतीला आणता आली नसल्याने आसनगावातली पाणी टंचाई आगामी काळात भीषण रुप धारण करणार असल्याचे चित्र दिसते आहे.

ठाणे जिल्हा परिषदेकडून दरवर्षी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई निवारण करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजुर के ला जातो. यामध्ये आसनगांव पूर्व व पश्चिम या दोन विभागासाठी मागच्या वर्षी २० लाख तर चालु वर्षी ४० लाख रुपये निधी मंजुर झाला आहे. परंतु हा निधी कु ठे खर्च के ला जातो याची माहिती नागरीकांना मिळत नाही. त्यामुळे याचा हिशोब गुलदस्त्यातच ठे वला जातो का असा सवाल नागरीक विचारत आहेत. नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आसनगांव ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.त्यामुळे अनेक जण पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. तर वसुली होत नसल्यामुळे वीज वितरण कं पनीचे अंदाजे ६ ते ७ लाख रुपये ग्रामपंचायतीकडून थकीत आहेत, त्यामुळे वसुलीसाठी वीज वितरण कं पनी ही पाणी पुरवठ्याचे मिटर सिल करीत असते. त्यामुळे एकं दरीत आसनगावच्या पाणीपुरवठ्याची अवस्था दयनीय झाली आहे.