बेकायदा बांधकामांना पाणी; दिवेकरांना प्यायला का नाही ?

शेकडो नागरिकांच्या मोर्चाचे भाजपने केले नेतृत्व
रवींद्र चव्हाण, संजय केळकर, निरंजन डावखरे सहभागी
ठामपा मुख्यालयासमोर महिलांनी फोडली मडकी 

ठाणे : दिव्यात पाणी प्रश्न पेटला असून दिवेकरांच्या प्राणीप्रश्नावर पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बुधवारी ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण आणि निरंजन डावखरे हे तीनही आमदार रस्त्यावर उतरले. महापालिका मुख्यालयासमोर मडकी फोडून महिलांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.

सत्ताधारी हे बिल्डर लॉबीसाठी काम करत आहे. दिव्यात मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेल्या अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवले जाते, पण दिवेकरांना पिण्यासाठी
त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नाही. सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेमुळेच दिवेकरांची पाण्यासाठी फरफट होत असल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी यावेळी के ला. ठाणे शहराबरोबरच दिव्यात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. गेले चार ते पाच दिवसांपासून दिव्यात पाणी नाही. मध्यरात्री १२ नंतर पाणी येत असल्याने पाणी भरायचे कसे असा प्रश्न दिव्यातील महिला वर्गाला पडला आहे. दिव्याच्या पाणी प्रश्नसंदर्भात पालिका प्रशासनाला अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला असून प्रशासनाकडून मात्र याची गंभीर दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतापलेल्या दिवेकरांनी बुधवारी ठाणे महापालिके वर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जेवढे पैसे कमावतो ते सर्व पैसे पाण्यासाठी खर्च होत असल्याची खंत यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त के ली.

आमदार संजय के ळकर, निरंजन डावखरे आणि रवींद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन दिव्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा के ली. दिव्यासाठी ३५ एमएलडी पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला असून प्रत्यक्षात मात्र २८ ते २९ एमएलडीच पाणी मिळत असल्याची कबुली प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. कळवा मुंब्रा रिमॉडलिंगचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून एमआयडीसीकडून देखील वाढीव कोटा मिळणार असल्याची माहिती यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. मात्र डिस्ट्रिब्युशन लाईन टाकण्याचे काम पूर्ण न झाल्याने हा प्रश्न मार्गी लागला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी एका महिन्यात ट्रान्समिशनची कामे पूर्ण करू तसेच तोपर्यंत मागणी प्रमाणे टँकरचा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. या मोर्चात प्रदेश सचिव संदीप लेले, महिला मोर्चा शहर अध्यक्षा मृणाल पेंडसे, मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, ज्योती पाटील आणि इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम ज्या ठेकेदाराला देण्यात आले, त्या संबंधित ठे केदाराचे महापालिके ने तब्बल ६५ कोटींचे बिल थकवले असल्याची कबुली प्रशासनाच्या वतीने यावेळी देण्यात आली. त्यामुळेच हे काम रखडले असल्याचे यावेळी उघड झाले. या मुद्द्यावरून आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तर तीन ठे केदारांना एकत्र करून त्यांच्यात टक्केवारी वाटून देण्यात आली आहे. त्यामुळे हा सगळा घोळ असून यामागे सत्ताधारी असल्याचा आरोप यावेळी संजय के ळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी के ला.