ठाणे : महापालिके तील तीन सहायक आयुक्तांना उपायुक्त पदावर बढती मिळाली असून त्यामध्ये कल्पिता पिंपळे, शंकरपाटोळे आणि किरण तायडे यांचा समावेश आहे. पिपंळे यांना उपायुक्त पदावर पदोन्नीत देत राज्य शासनाने त्यांची पनवेल महापालिके त बदली के ली आहे.
ठाणे महापालिके त उपायुक्त दर्जाची एकू ण दहा पदे आहेत. त्यापैकी सहा जागांवर शासनाचे तर चार जागांवर पालिके च्या अधिकाऱ्यांची ेमणुक करण्यात आली आहे. पालिके ने वाढीव आकृ तीबंध आराखडा तयार के ला होता. त्यास नगरविकास विभागाने नुकतीच मंजुरी दिली असून उपायुक्त दर्जाची दोन पदे मंजुर झाली आहेत. या दोन जागांवर पालिका प्रशासनाने नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे आणि कर विभागातील अधिकारी किरण तायडे यांची नियुक्ती के ली आहे.
गेल्यावर्षी घोडबंदर येथील कासारवडवली भागात सहायक आयुक्त कल्पिता पिपंळे यांच्यावर एका फे रिवाल्यांने चाकू ने हल्ला के ला होता. त्यात त्यांना हाताची बोटे गमवावी लागली. फे रिवाल्यांवर कारवाई करताना हा हल्ला झाला होता. काही महिन्यांच्या उपचारानंतर त्या पुन्हा कामावर हजर झाल्या होत्या. त्या माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त म्हणून काम पहात होत्या. राज्य सरकारने त्यांना उपायुक्त पदाची बढती देऊन त्यांची पनवेल महापालिके त बदली के ली आहे.