वेळेआधीच नालेसफाई हाती; निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात

पावसाळ्यातही चार महिने मोहीम

ठाणे : ठाणे पालिके चा सर्व कारभार पालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. विपीन शर्मा यांच्या माध्यमातून राबवला जात असल्याने यामुळे महत्वाच्या कामांनाही यामुळे
गती मिळाली आहे. परिणामी नालेसफाईच्या कामांना दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ दिवस आधीपासूनच सुरुवात होणार आहे.

महापालिके चे प्रशासक म्हणून कामकाज पाहणारे आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दररोज शहरात दौरे करून स्वच्छता, सुशोभिकरण आणि विकासकामांचा आढावा घेत आहेत. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिं दे हे सुद्धा शहरात दौरे करून विकासकामांचा आढावा घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री शिं दे आणि आयुक्त शर्मा यांनी नालेसफाईची कामे लवकर सुरु करण्याचे निर्देश घनकचरा विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामाच्या निविदा काढल्या होत्या. या निविदा उघडण्यात आल्या असून त्यातील दर निश्चिती प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रीया पुर्ण करून पुढील आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरूवात करण्याची योजना घनकचरा विभागाने आखली आहे. शहरात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या किं वा दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. यंदा मात्र एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच म्हणजेच दरवर्षीपेक्षा १५ दिवसआधीच नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. तशाप्रकारचे नियोजन पालिके च्या घनकचरा विभागाकडून आखण्यात आले आहे. नालेसफाईची कामे ७ जून अखेरपर्यंत शंभर टक्के पुर्ण के ल्यानंतरही पावसाळ्यात
नाल्यामधील वाहता कचरा काढण्याचे आणि प्रवाहातील अडथळा दर कर ू ण्याचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत के ले जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्य नाले आणि त्यास जोडणारी लहानमोठे नाले असे एकु ण ३०० किमी लांबीचे नाले आहेत. नालेसफाईचे काम हे कमी वेळेत व्हावे यासाठी
नऊ प्रभाग समितीस्तरावर कामाचे विभाजन कऱण्यात आले आहे. त्यानुसार या कामाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. ही कामे करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन या मशिनचा वापर करून नाल्यातील गाळ काढण्यात येणार आहे. ज्या नाल्यात मोठ्य प्रमाणात गाळ आहे, त्या नाल्याची सफाई पालटुन यंत्राद्वारे के ली जाणार आहे. यंदा विशेषतः पालटून यंत्राद्वारे नाल्यांची खाडीतील मुखे साफ के ली जाणार आहेत. या कामावर पर्यवेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात येणार आहे. नालेसफाईच्या कामांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच नालेसफाईची कामे ७ जून अखेरपर्यंत शंभर टक्के पुर्ण के ल्यानंतरही पावसाळ्यात नाल्यामधील वाहता कचरा काढण्याचे आणि प्रवाहातील अडथळा दर करण् ू याचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत के ले जाणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

प्रभाग समितीनिहाय नाल्यांची संख्या
कळवा – २०१
नौपाडा – ४९
वागळे इस्ट टे – ३८
लोकमान्य-सावरकर – ३४
उथळसर – ३४
वर्तकनगर – २९
माजीवाडा- मानपाडा – ४४
मुंब्रा – ८०
दिवा -१३१