भंगाराच्या पैशातून टीएमटी घेणार २५ सीएनजी बसेस

ठाणे : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेले भंगार अखेर विकले गेले असून ठाणे परिवहन सेवेच्या तिजोरीत ७.६० कोटी रुपये जमा होणार आहेत. या रक्कमेतून २५ सीएनजी
बसेस घेण्याचा प्रस्ताव आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या आगारांमध्ये बंद पडलेल्या बसेस अनेक वर्षांपासून पडून होत्या. यामुळे परिवहन सेवेची प्रतिमा डागाळली जात होती. या बसेस भंगारात काढण्याचे अनेकदा ठरले होते. परंतु कार्यवाही होत नव्हती. अखेरीस या भंगाराला १.८० कोटी रुपये येतील असा अं दाज व्यक्त के ला जात होता. प्रत्यक्षात ३६ जणांनी या निविदेत भाग घेतला आणि त्यापैकी सर्वाधिक ५.८० कोटी रुपये देणाऱ्या ठे के दारास निविदा देण्यात आली. याव्यतिरिक्त लहान-मोठे भंगार विकू न वेगळे १.८० कोटी रुपये मिळणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम सीएनजी बसेस विकत घेण्यासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून टीएमटी सरासरी दोन ते सव्वा दोन लाख प्रवाशांची दररोज वाहतूक करीत आहे. उत्पन्नही २५ लाख रुपयांवर गेले आहे. इलेक्ट्रिकल बसेसच्या निविदाही मंजूर झाल्या असून गणपतीपूर्वी २५ बसेस ताफ्यात दाखल होतील असा अं दाज आहे.