नवी मुंबई : कोकण विभगातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर याचार जिल्ह्यांतील आगारांत मिळून 4,910 पेक्षा अधिक क र्मच ा र ी सं प स ो डून कामावर हजर झाले आहेत. 50 टक्क्याहून अधिक एसटी वाहतूक सुरु झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाने दिली.
२८ ऑक्टोबर २०२१पासून राज्यातील जवळपास ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. संपामुळे राज्यातील एसटी सेवा ठप्प झाली होती. 8 ते18 एप्रिल 2022 या कालावधीत कोकण विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील आगारांत 1,425, रायगड जिल्ह्यातील आगारांत 1,644, रत्नागिरी जिल्ह्यातील आगारांत 1,125 आणि पालघर जिल्ह्यातील आगारांत 716 कर्मचारी संप सोडून कमावर हजर झाले आहेत. कोकणात लवकरच शंभर टक्के एस.टी. वाहतूक सुरु होईल, असे आगार प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.