आयुक्तांच्या दौऱ्याची आगाऊ खबर देऊन बेकायदा बांधकामे वाचवली

ऑडिओतील महिला अधिकारी कोण?
भाजपा आमदारांकडन आयुक्तांना पेन ड्राईव्ह सादर

ठाणे: आयुक्तांच्या दिवा दौऱ्याची आगाऊ खबर देऊन अनधिकृ त बांधकामे बंद करण्याचा आदेश देणारी ती महिला अधिकारी कोण आहे? असा सवाल भाजपाचे आमदार संजय के ळकर आणि जिल्हाध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे यांनी के ला आहे. ऑडिओ क्लिप असलेला पेन ड्राईव्ह आयुक्तांकडे सुपूर्द करून त्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत अनधिकृ त बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र, महापालिके च्या अतिक्रमण विभागाची कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा नेहमी होते. काही हितसंबंधी व्यक्तींची बांधकामे वाचविण्यासाठी बिल्डरांना कारवाईची आगाऊ खबर दिली जाते. त्यामुळे बडी बांधकामे वाचविली जातात. तर किरकोळ बांधकामांवर कारवाईचा देखावा निर्माण के ला जातो. या आरोपांना दुजोरा देणारी एक ऑडिओ टेप व्हायरल झाली आहे. या टेपमध्ये `नाना, उद्या सकाळीच कमिशनर साहेब दिव्यात आहेत. सगळी कामे कटाक्षाने बंद ठे वा’, अशा सुचना एका महिला अधिकाऱ्याकडून दिल्या जात असल्याची टेप व्हायरल झाली आहे. या टेपची
काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. तसेच ती महिला कोण, याबाबत अं दाज व्यक्त होत आहेत.

या पार्श्वभूमीवर या ऑडिओ प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी. तसेच संबंधित महिला अधिकारी कोण आहे, याचा तपास करून तिला तातडीने निलंबित करावे, अशी मागणी आमदार संजय के ळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची आज भेट घेऊन के ली.