महापालिका निवडणुकीचे फटाके दिवाळीत फुटणार

इच्छुक उमेदवारांची प्रतिक्षा वाढली

ठाणे/आनंद कांबळे : मे आणि जून महिन्यात ठाणे महापालिके सह राज्यातील १८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आशा मावळली असून दिवाळीच्या दरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त के ली जात आहे परंतु ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला नाही तर निवडणुका आणखी पुढे जाऊ शकतात.

ठाणे महापालिके सह राज्यातील १८ महापालिकांची मुदत ६ मार्च रोजी संपुष्टात आली आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सध प्रशासकांच्या हातात गेला आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात के ली होती, परंतु न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली होती. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने प्रभाग रचना देखील तयार के ली होती, परंतु राज्य सरकारने प्रभाग रचना तयार करण्याचे अधिकार स्वतःकडे घेऊन तसा कायदा के ला, त्यामुळे निवडणुकीचे कामकाज ठप्प झाले होते. नवीन प्रभाग रचना तीन महिन्यांत होईल, अशी अपेक्षा होती, परंतु महापालिके त प्रभाग रचना तयार करण्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही.

निवडणुकीबाबत राज्य सरकार मे जून दरम्यान निवडणूक घेण्याबाबत काही आदेश देतील अशी शक्यता होती, परंतु पावसाळा सुरू होण्यासाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या दरम्यान निवडणूक घेण्यासाठी लागणारा वेळ कमी पडत आहे, त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणूक दिवाळी दरम्यान होईल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला दिली.

राज्य सरकारने निवडणूक आयोगाने पूर्वी दिलेल्या निर्देशानुसार नवीन प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच आगामी महापालिका निवडणूक देखील तीन सदस्य पॅनेल प्रमाणेच होणार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांना ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.