ठाणे: शहरातील कोरोना रूग्णवाढ मंदावली असून आज फक्त एका नवीन रुग्णाची भर पडली तर जिल्ह्यात दोन नवीन रूग्ण सापडले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत फक्त वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात एक रूग्ण सापडला आहे. उर्वरित आठ प्रभाग समिती भागात एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही तर जिल्ह्यात नवी मुंबई आणि ठाणे महापालिका येथे प्रत्येकी एक रूग्ण नोंदवला गेला आहे. जिल् ह् या तील विवि ध रुग्णालयात आणि घरी ५१ जणांवर उपचार सुरू आहेत तर ठाणे शहरात रुग्णालयात दोन आणि १५जण घरी उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत सहा लाख ९६,९३२ ठाणेकरांनी कोरोनावर मात के ली आहे. आज एकही जण दगावला नसून ठाणे शहरात आत्तापर्यंत २१२७ रूग्ण दगावले आहेत तर जिल्ह्यात ११,८८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण सात लाख ८८७५जण
कोरोना बाधित मिळाले आहेत.