बॅनर काढल्याने भीमसैनिकांकडून रास्ता रोको; प्रचंड वाहतूक कोंडी

ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवानंतर के वळ काही तासातच शुभेच्छांचे बॅनर उतरविण्यात आल्याने ठाण्यातील संतप्त भीमसैनिकांनी
रस्त्यावर धाव घेत मानपाडा येथे रस्ता रोको के ला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांच्या मनधरणीनंतर अखेर भीमसैनिकांनी हे आंदोलन
मागे घेतले.

गुरुवारी १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेच शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आं बेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. ठाण्यात ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. तसेच विविध कार्यक्रमही आयोजित के ले होते. जयंतीला १२ तास होत नाही तोच शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान जयंतीनिमित्त लावलेले बॅनर हटविण्यात आले. यामुळे ठाण्यातील मानपाडा भागात तणाव निर्माण झाला. यावेळी आं दोलनकर्त्यांनी आम्हाला कोणतीही नोटीस न देता एवढ्या तातडीने बॅनर का उतरवण्यात आले असा संतप्त सवाल के ला. इतर नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांचे बॅनर किती दिवस तसेच लागलेले आपण नेहमीच पाहतो परंतु बाबासाहेबांचे बॅनर मात्र काही तासातच उतरवण्यात आल्याने समाजात तेढ निर्माण होईल, अशी शक्यता यावेळी आं दोलनकर्त्यांनी वर्तविली.पण, आम्ही भगवान बुद्धाचे अनुयायी आहोत आणि शांततेचा मार्ग नेहमीच अवलंब होतो परंतु आमच्या सोबतच असा दजाभाव करण् ु यात आल्याने आम्ही संतप्त झालो आहोत आणि त्यामुळे हे आं दोलन करण्यात आल्याचेही यावेळी आं दोलनकर्त्यांनी सांगितल